महाराष्ट्राने तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली ! सक्रिय रुग्णसंख्या 12 लाखापर्यंत …

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :-  कोविड-19 महामारीच्या पहिल्या आणि दुसर्‍या दोन्ही लाटेचा देशात सर्व राज्यांपैकी महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला होता. अशात महाराष्ट्राने कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली आहे.

केंद्राने आणि काही आरोग्य तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या शिखरावर सक्रिय रुग्णांची संख्या 12 लाख पर्यंत पोहोचू शकते.

हा अंदाज, या वर्षी मार्च ते जून या कालावधीत दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात जिल्हास्थरावर नोंदवण्यात आलेल्या सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्येच्या आधारावर आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्णसंख्या यावर्षी 25 एप्रिलला- 6,98,354 एवढी नोंदवली गेली होती. माध्यमाशी बोलतांना एन रामास्वामी, राष्ट्रीय आरोग्य अभियान,

महाराष्ट्र आयुक्त म्हणाले की ,“आम्ही तिसऱ्या लाटेत 12 लाख सक्रिय रुग्णसंख्या आसेल या अंदाजानेच तयारी करत आहोत”. यापूर्वी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले होते की,

कोविड टास्क फोर्सने दिवाळीनंतर तिसऱ्या लाट येऊ शकल याबद्दल सावध केले आहे. “ तिसऱ्या लाटेसाठी सध्यातरी अनुकूल स्थिती नाही.

राज्य टास्क फोर्सने दिवाळीनंतर तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. आम्ही परिस्थितीचे मूल्यांकन करत आहोत, ”ते म्हणाले होते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe