Maharashtra Weather : यंदाच्या हंगामात मान्सून (Monsoon) केरळमध्ये (Kerala) वेळे आधीच दाखल झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील (Maharashtra) काही भागात देखील मान्सून ने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे. मात्र काही जिल्हे अजूनही मान्सून च्या प्रतीक्षेत असल्याचे दिसत आहे.
बुधवारीही महाराष्ट्रात पावसाची (Rain) प्रक्रिया सुरू राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नियमित पाऊस पडत असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 21 जूनपर्यंत मुंबईसह राज्यांच्या इतर भागांमध्ये अधूनमधून पाऊस सुरू राहील.
याबाबत हवामान खात्याने अलर्टही (Alert) जारी केला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रातील हवेचा दर्जा निर्देशांक बहुतांश शहरांमध्ये ‘चांगल्या ते मध्यम’ श्रेणीत नोंदवला जात आहे. बुधवारी महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
मुंबई (Mumbai)
बुधवारी मुंबईत कमाल तापमान 34 आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 118 वर नोंदवला गेला.
पुणे (Pune)
पुण्यात कमाल तापमान 36 तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘मध्यम’ श्रेणीत 119 वर नोंदवला गेला.
नागपूर (Nagpur)
नागपुरात कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील आणि पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. त्याच वेळी, हवा गुणवत्ता निर्देशांक 52 आहे, जो ‘समाधानकारक’ श्रेणीत येतो.
नाशिक (Nashik)
नाशिकमध्ये कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीमध्ये 13 आहे.
औरंगाबाद (Aurnagabad)
औरंगाबादमध्ये कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडू शकतो. हवेचा दर्जा निर्देशांक ‘चांगल्या’ श्रेणीत 47 आहे.