Maharashtra : “महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले”

Published on -

Maharashtra : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. महाराष्ट्रातील वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ले केले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून आक्रमक होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे की, दिल्लीच्या पाठिंब्याशिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ. अशा आशयाचे ट्विट राऊत यांनी केले आहे.

तसेच राज्य सरकारावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे. महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.

तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले. स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हा षंढपणा आहे. अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर ट्विटमधून केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News