मुंबई : भाजप (BJP) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टोला लगावला आहे. ४ राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर भाजपकडून महाविकास आघाडीला सतत डिवचण्याचा प्रयत्न चालू असल्याचे दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस हे मावळ (Maval) तालुक्यात बैलगाडा शर्यतीला (Bullock cart race) गेले होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
मी ठरवलं की नंबर 1 येतोच, मात्र महाविकास आघाडीचे नेते तीन मार्कशीट (MarkSheet) जूळवून पहिले आले असा घणाघाती टोला त्यांनी यावेळी आघाडीला लगावला आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडा शर्यतींवरही भाष्य केले आहे. बैलगाडा शर्यती वर बंदी आण्याऱ्यांनी मावळात येऊन पाहावे. आपलं सरकार आलं आणि आम्ही प्रयत्न करत बैलगाडा शर्यत सुरू केली.
मात्र ही मंडळी पुन्हा कोर्ट मध्ये गेली आणि बंदी आणली. मी त्यावेळी एक समिती निर्माण केली आणि बैल हा धावणारा प्राणी आहे म्हणून कागदपत्रे कोर्टमध्ये देत ही बंदी उठवली असेही ते म्हणाले.
तसेच मला आज आनंद आहे, माझा बैलगाडा इथं धावला, पहिला नंबर ही आला. 2014 आणि 2019ला देखील जनतेने आम्हाला पहिलं आणलं,
पण काहींनी शाळा केली. मावळच्या धर्तीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला, तो कधी मागे हटत नाही असे आव्हानही त्यांनी आघाडीला दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असल्याचे दिसत आहे. २०१९ ला सर्वात जास्त जागा भाजपकडे असूनही फडणवीसांना मुख्यमंत्री होता आले नाही. त्यामुळे त्यांनी आतापसूनच मोर्चाबंधांनी सुरु केल्याचे दिसत आहे.