अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नुकतीच मुंबई येथे राज्यातील नगर पंचायतीच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण जाहीर झाले असल्यामुळे आमदार रोहित पवार कोणाच्या हाती नगरपंचायतच्या सत्तेची चावी देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपात जोरदार लढत झाली मात्र ती काहीशी एकतर्फीच झाली. एकूण १७ प्रभागात राष्ट्रवादीने १२ तर काँग्रेसने ३ जागा बाजी मारत भाजपाला अवघ्या २ जागा पुरतेच मर्यादित ठेवले. या लढतीत आ. रोहित पवार यांनी माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांना पुन्हा एकदा आस्मान दाखवले.
कर्जतच्या जनतेने आ. रोहित पवार यांच्यासह पुन्हा एकदा माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्यावरच विश्वास दाखवला. नगरसेवक पदाची निवडणूक झाल्या नंतर आता सर्वांचे लक्ष नगराध्यक्षपदाच्या सोडतीकडे लागले होते.
दरम्यान काल मुंबई येथे मंत्रालयात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये कर्जत नगरपंचायत ही महिला सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी दिली.
महिलासाठी आरक्षित झालेल्या कर्जत नगर पंचायतीच्या नागराध्यक्षपदी कोणत्या महिलेची नगर सेविकेची वर्णी लागते. याकडे कर्जत सह जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. कर्जत मध्ये राष्ट्रवादीने १२ जागा जिंकून स्पस्ट बहुमत मिळविले आहे तर मित्रपक्ष काँग्रेसच्या ही तीन जागा निवडून आलेल्या आहेत.
त्यामुळे आ रोहित पवार हे राष्ट्रवादीच्याच महिला नागरसेविकेला प्रथम संधी देतील की मित्र पक्ष काँग्रेसला प्राधान्य देतील हे आगामी काळात कळेल.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम