Mahindra Thaar : महिंद्रा कंपनीची ऑफ रोडींग कार थारला भारतीय ऑटो मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. नवीन जनरेशन महिंद्रा थार 2020 मध्ये लॉन्च झाल्यापासून ग्राहकांमध्ये थार खरेदीसाठी मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आता कंपनीकडून थारचे नवीन मॉडेल लवकरच भारतामध्ये लॉन्च केले जाणार आहेत.
महिंद्रा कंपनीची थार कारच्या मागणीत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या महिंद्रा कंपनी थारचे मॉडेल रियर व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येते. या कारची एक्स शोरूम किंमत 11 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
आता कंपनीकडून 4WD आणि 5-डोर व्हेरियंट थार भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाणार आहे. त्यामुळे आता थार प्रेमींना आणखी थारचे नवीन मॉडेल खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे.
महिंद्रा एसयूव्हीच्या किमती वाढल्या
महिंद्रा कंपनीकडून त्यांच्या लोकप्रिय एसयूव्हीच्या च्या किमती गेल्या काही दिवसांपूर्वीच वाढवल्या गेल्या आहेत. आता थारप्रेमींना मोठा धक्का देत महिंद्राने एसयूव्हीच्या किमतीत एक लाख रुपयांनी वाढ केली आहे.
कोणत्या प्रकारची किंमत किती आहे
कंपनीनेकडून नुकतेच त्यांची वाहने BS6 फेज-II आणि RDE इंधन नियमांचे पालन करण्यासाठी अपडेट करण्यात आली आहेत. हे इंधन नियम 1 एप्रिल 2023 पासून बंधनकारक केले आहेत. कंपनीकडून नवीन थारच्या किमतीत 1.05 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
या दरवाढीनंतर, थार एक्स-ओ- हार्ड टॉप डिझेल एमटी आरडब्ल्यूडी व्हेरियंटच्या किमतीत 55,000 रुपयांनी वाढ झाली आहे, तर एलएक्स हार्ड टॉप डिझेल एमटी आरडब्ल्यूडी व्हेरियंटच्या किमतीत 1.05 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच, इतर सर्व प्रकारांच्या किमतीत 28,000 रुपयांनी वाढ झाली आहे.
या कारसोबत होणार स्पर्धा
ऑटो एक्सपो 2023 मध्ये, मारुती सुझुकीकडून सर्व-नवीन जिमनी एसयूव्ही सादर करण्यात आल्या होते, ज्याचे बुकिंग सुरू झाले आहे. भारतीय बाजारात कंपनी लवकरच नवीन जिमनी लाँच करणार आहे, जी थेट महिंद्रा थारशी स्पर्धा करणार आहे.
विदेशी मॉडेलच्या विरोधात जिमनीचा 5-डोअर प्रकार देशात लॉन्च करण्यात येणार आहे आणि कंपनी त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी नवीन 5-डोअर थार घेऊन येत आहे. Mahindra 5 डोअर थारचे अनेक वेळा फीचर्स झाली आहे आणि लवकरच कंपनी ही SUV भारतात लॉन्च करणार आहे.
किती असेल किंमत?
लीक झालेल्या माहितीवर विश्वास ठेवायचा झाला तर महिंद्र थारच्या 4-व्हील ड्राइव्ह एंट्री लेव्हल व्हेरिएंटची किंमत सर्वात कमी असणार आहे. कंपनी लॉन्चच्या वेळी सादर करण्यात आलेले बेस AX मॉडेल परत आणण्याची शक्यता आहे.
कंपनी हा प्रकार 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर डिझेल इंजिन पर्यायांसह ऑफर करेल जो केवळ मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडण्यात येतील. 1.5-लिटर डिझेल इंजिन अजूनही महिंद्र थारच्या RWD प्रकारात उपलब्ध करण्यात येत आहे.