Mahindra XUV700 : महिंद्रा XUV700 ला लोकांची मोठी पसंती ! जबरदस्त बुकिंग; मागणीत प्रचंड वाढ

Ahmednagarlive24 office
Published:

Mahindra XUV700 : महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून अनेक कार लॉन्च केल्या जात आहेत. तसेच महिंद्राच्या गाड्यांना लोक मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद देत आहे. महिंद्रा कंपनीने नुकतीच महिंद्रा स्कॉर्पिओ एन (Mahindra Scorpio n) लॉन्च केली आहे.

या गाडीलाही लोक चांगला प्रतिसाद देत आहे. महिंद्रा कंपनीकडून गाड्यांना वेगवेगळे फीचर्स दिल्यामुळे लोकांची गाड्या खरेदी करण्याकडे कल वाढत आहे. महिंद्रा XUV700 ला (Mahindra XUV700) सुद्धा लोक प्रचंड प्रतिसाद देत आहेत.

महिंद्रा बोलेरो नंतर XUV700 ही कंपनीची भारतातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV आहे. गेल्या महिन्यात (म्हणजे जून 2022) कंपनीने 6,022 वाहनांची विक्री केली. सेमीकंडक्टरच्या कमतरतेमुळे महिंद्राला वेळेवर वितरण करणे कठीण होत आहे.

१.४३ लाख वाहनांचे ऑर्डर प्रलंबित

अलीकडील मीडिया रिपोर्टनुसार, महिंद्राच्या XUV700, थार, बोलेरो आणि XUV300 या चार मॉडेल्ससाठी 1.43 लाख ऑर्डर प्रलंबित आहेत. खरं तर, XUV700 चा प्रतीक्षा कालावधी प्रकार आणि स्थानावर अवलंबून 2024 पर्यंत वाढवण्यात आला आहे. XUV700 ला दर महिन्याला सरासरी 9,800 बुकिंग मिळतात.

Mahindra XUV 700 किंमत

Mahindra XUV700 (Mhindra XUV700 SUV किंमत) ची किंमत 13.18 लाख ते 24.58 लाख रुपये आहे. पेट्रोल मॉडेलची किंमत 13.18 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 22.75 लाख रुपयांपर्यंत जाते.

डिझेल व्हेरिएंटची किंमत 13.70 लाख ते 24.58 लाख रुपये आहे. याचे 11 स्वयंचलित प्रकार आहेत, ज्यांची किंमत 16.84 लाख ते 24.58 लाख रुपये आहे. वर दिलेल्या सर्व किंमती एक्स-शोरूम, दिल्ली आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe