अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलने करण्यात येत आहे. यातच मराठा आरक्षणाबरोबरच आता ओबीसी आरक्षणासाठी समाजबांधव एकत्र आलं असून आंदोलनाचा आक्रमक पवित्र स्वीकारला आहे.
नुकतेच ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सावता परिषदेच्या वतीने कर्जत तहसीलवर सोमवारी मूक मोर्चा काढण्यात आला होता.

ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे, या मागणीचे निवेदन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांना सावता परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त आरक्षणाच्या याचिकेवरून राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत ग्रामपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीसाठी राखीव असलेले आरक्षण रद्द केले आहे.
यामुळे राज्यातील ओबीसी समाजाला धक्का बसला आहे. केंद्र व राज्य सरकारने या विषयात गांभीर्याने लक्ष घालून ओबीसी समाजाला आरक्षण पूर्ववत कसे मिळेल
याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी यांनी दिला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम