ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे उत्तर सभा चांगलीच गाजवली आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरही खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, अजित पवारांच्या घरी, त्यांच्या बहिणींच्या घरी रेड पडते. त्यानंतरही पवार आणि मोदींचे मधुर संबंध राहतात, कसं काय ?

पवार साहेबांना कधीही भडकलेलं बघितलेलं नाही. सुप्रिया सुळें नी बोलायंच काय हो. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत. सुप्रिया सुळेंनी बोलायंच काय हो. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळेत.
सुप्रिया सुळे सांगतायत, लाव रे तो व्हिडीओने घाबरतील असं. अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी पडत नाही. याचं कारण मला कळेल का ? पवार साहेब मोदींची भेट घेतात, पुढचं सांगायला.
शरद पवारांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, देशमुख गेले. परत भेट घेतली. अजितचं काय? परत भेट. मलिक जरा हल्ली गडबड करतो, थोडं लक्ष द्या.
पुन्हा खासदारांचा फोटो काढला. परत भेट. असं म्हणे, आत काय बोलले माहीत नाही. मी त्यांच्या वाढदिवसाच्या भाषणात बोललो होतो.
पवार साहेब खूश झाले की भीती वाटायला लागते. आज ते राऊंतावर खूश आहेत. कधी टांगलेला मिळेल, कळणार पण नाही. यात काँग्रेसवालेपण आहेत. आणि उशिरा समजतं की तेव्हा ते बोलले होते ते आज लागलं अशी टीकाही त्यांनी केली आहे.