Manoj Modi : भारतातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या ते एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला एक दोन नाही तर 1500 कोटींचे घर गिफ्ट म्हणून दिले आहे.
त्यांनी या कर्मचाऱ्याच्या कामावर प्रभावित होऊन हा मोठा निर्णय घेतला. मनोज मोदी असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते मुकेश अंबानींचा उजवा हात मानले जातात. एकूण 1500 कोटी रुपयांचं 22 मजली आलिशान घर ज्यांना गिफ्ट दिले आहे ते मनोज मोदी आहेत तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मनोज मोदी कोण आहेत ? जाणून घ्या
मुकेश अंबानी यांनी मनोज मोदी यांना घर गिफ्ट दिले आहे ते अंबानी यांचे महाविद्यालयीन मित्र आहेत. दोघेही एकाच वर्गात शिकत होते. या दोघांनीही मुंबई विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातून एकत्र शिक्षण घेतले आहे.
शिक्षणानंतर जेव्हा मुकेश अंबानी रिलायन्समध्ये काम करू लागले तेव्हा त्यांनी मनोज यांनाही आपल्यासोबत बोलावले. 1980 पासून मनोज मोदी हे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करत आहेत. जर अंबानी यांना व्यवसायाशी निगडित कोणताही मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तर ते मनोज मोदींवर सर्वात जास्त विश्वास ठेवतात.
मनोज मोदी हे फक्त अंबानींच्या बिझनेसशी संबंधित नाही तर ते अंबानी कुटुंबातही त्यांना खूप आदर देण्यात येतो. ते अंबानी कुटुंबातील मुलांसाठी मार्गदर्शक म्हणून करतात. 2016 मध्ये मोदी यांच्या मुलीचे मुकेश अंबानी यांच्या घरी लग्न झाले होते.
मास्टर माईंड म्हणून ओळख
याशिवाय मनोज यांना रिलायन्समध्ये मास्टर माईंड म्हणण्यात येते. मनोज मोदी यांनी अंबानींचे हजिरा पेट्रोकेमिकल, जामनगर रिफायनरी, टेलिकॉम बिझनेस आणि रिलायन्स रिटेल यांसारखे मोठे प्रकल्प हाताळले आहेत.
मोदी यांनी जामनगर रिफायनरीत काम करत असताना कंत्राटदार आणि व्यापारी यांच्यात प्रचंड व्यवहार केले होते. या प्रकल्पानंतर ते मुकेश अंबानींचे आवडते बनले. रिलायन्सच्या जिओ सेवेमागे मनोज मोदी यांचा मोठा हात आहे.
मनोज मोदी यांचे सध्याचे पद काय आहे?
सध्या मनोज मोदी हे रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक पदावर कार्यरत आहेत. त्यांनी धीरूभाई अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्समध्ये काम सुरू केले असून त्यानंतर आता मुकेश अंबानी आणि त्यांची मुले-मुली ईशा-आकाश-अनंत अंबानी यांच्यासोबतही काम करत आहेत.
एकंदरीत सांगायचे झाले तर मोदी यांनी अंबानी कुटुंबाच्या तीनही पिढ्यांसह एकत्र काम केले आहे. जरी असे असले तरी त्यांचे नाव जास्त चर्चेत नाही, कारण त्यांना लाइमलाइटपासून दूर राहायला आवडते. ते पार्ट्यांमध्ये दिसत नसून मीडियापासून दूर राहतात. तसेच कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ते दिसत नाही.
कसे आहे घर?
अंबानींकडून भेट देण्यात आलेल्या घराला ‘वृंदावन’ असे नाव दिले आहे. हे घर मुंबईतील नेपियन-सी रोडवर बांधले असून नेपियन-सी रोड हा मुंबईचा पॉश एरिया म्हणून ओळखला जातो, ही इमारत 1.7 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रात पसरलेली असून या 22 मजली घराचा प्रत्येक मजला 8000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे.
त्याचे डिझाइनर हे तलाटी आणि भागीदार एलएलपी असून या इमारतीचे ७ मजले हे केवळ कार पार्किंगसाठी राखीव ठेवले आहेत. या इमारतीच्या तिन्ही बाजूंनी समुद्राचे दृश्य दिसते. तसेच यात बसवण्यात आलेले फर्निचरही खूप खास असून जे इटलीमधून आयात केले आहे.