अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- येथील वाडीया पार्क मैदानावर संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय क्रॉस कंट्री स्पर्धेत जिल्ह्यातील ३०० खेळाडूंनी सहभागी होऊन मैदान गाजवले .
यात मरकड ,वलवे ,भंडारी , गहाणडुळे हासे यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक मिळवले . नुकत्याच या स्पर्धा अहमदनगर जिल्हा ॲम्युचर ॲथलेटीक्स असोशिएशनच्या वतीने आयोजित केल्या होत्या.

या स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते व संघटनेचे उपाध्यक्ष सुनिल जाधव यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष सुनिल गागरे यांच्या उपस्थित झाले .
या स्पर्धेचा क्रमवार निकाल पुढीलप्रमाणे – १६ वर्ष मुली – साक्षी भंडारी , साक्षी फापाळे , साक्षी हाडवळे .१८ वर्ष मुली- खुशी हासे , करीना बेग , माया ऐनापुरे .
२० वर्षे मुले -करण गहाणडुळे , दामोदर बढे , सागर सदगीर , साहेबराव काळे , सचिन बुचकुल , विकास खेडकर , २० वर्षे मुली – भाग्यश्री भंडारी ,विशाखा बास्कर ,सुरेखा मातने ,
गायत्री डांगे , प्रियंका आहेर , साक्षी मोरे . खुला गट ( पुरुष ) – किशोर मरकड , विक्रम बोरुडे ,प्रवीण गि-हे , प्रवीण राऊत ,विकास येवले ,कृष्णा थोरवे . खुला गट ( महिला ) पुनम वलवे ,
शितल भंडारी , गिता मुखेकर . या स्पर्धेसाठी दिनेश भालेराव , रमेश वाघमारे , संदीप घावटे , अजित पवार , श्रीरामसेतू आवारी ,अमित चव्हाण, गुलजार शेख, सचिन काळे यांनी पंच म्हणून काम केले .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम