कुत्र्याने मटण खाल्ले म्हणून विवाहित मुलीचा गोळी झाडून खून

Published on -

Maharashtra News:स्वयंपाक तयार केल्यानंतर कुत्र्याने मटण खाल्ल्याच्या रागातून दारूच्या नशेतील वडिलांनी आपल्या विवाहित मुलीचा गोळी झाडून खून केला. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात कार्ला येथे ही घटना घडली.

काजल मनोज शिंदे (वय २०) असे त्या विवाहित महिलेचे नाव आहे. ती पतीसह आपल्या माहेरीच राहत होती. रविवारी तिच्या पतीने मटण आणले होते. तीने व आईने मिळून स्वयंपाक केला.

मात्र, जेवण होण्यापूर्वीच कुत्र्याने मटण खाल्ले. यावरून त्या दोघींमध्ये भांडणे सुरू झाली. एकमेकींना जबाबदार धरून जोरजोरात भांडू लागल्या. त्यावेळी त्या महिलेचे वडील जवळच खाटेवर बसले होते.

दारूच्या नशेत असलेल्या वडिलांनी भांडणाऱ्या मायलेकीच्या दिशेने गोळी झाडली. ती मुलीला लागली. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe