Maruti Alto CNG : भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही सर्वात जास्त कार विक्री करणारी कंपनी आहे. मारुतीची अल्टो (Maruti Alto) ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे.
ही सगळ्यात स्वस्त सीएनजी कार (Alto CNG Car) आहे. ग्राहकांना आता 1 लाखाच्या डाउन पेमेंटसह ही कार (CNG Car) खरेदी करता येणार आहे. त्याचबरोबर या कारचे (Alto CNG) मायलेज देखील दमदार आहे.
1 लाख डाऊन पेमेंट तर मग किती ईएमआय
कंपनी या वाहनाच्या LXI ट्रिमसह CNG चा पर्याय देत आहे. Alto 800 CNG ची ऑन रोड (दिल्ली) किंमत 5.55 लाख रुपये आहे. येथे रु. 1 लाख डाउन पेमेंट आणि 5 वर्षांच्या कालावधीसह 10% बँक व्याज दर गृहीत धरत आहोत. या स्थितीत, तुम्हाला दरमहा 9671 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. अंतिम पेमेंटमध्ये, तुम्हाला फक्त 1,25,073 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील.
इंजिन आणि मायलेज
मारुतीच्या या हॅचबॅकमध्ये 0.8-लीटर पेट्रोल इंजिन (48PS आणि 69Nm बनवते) आहे. हे पाच-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येते. CNG वर चालवल्यावर आउटपुट 41PS आणि 60Nm पर्यंत घसरते. कंपनीचा दावा आहे की त्याचे मायलेज पेट्रोलसह 22.05kmpl आणि CNG साठी 31.59km/kg आहे.