Maruti Alto K10 : भारतीय बाजारात (Indian market) अनेक दिवसांपासून मारुती सुझुकीचा (Maruti Suzuki) दबदबा आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने Alto K10 या कारला बाजारात लाँच (Alto K10 Launch) केली होती.
विशेष म्हणजे आता या कारवर बंपर डिस्काउंट (Alto K10 discount) मिळणार आहे. जर तुम्ही ही कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
मारुती अल्टो K10 डिस्काउंट
मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात लॉन्च करण्यात आली होती. भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त कार म्हणून Alto 800 ची जागा घेत, नुकतीच लॉन्च केलेली Alto K10 बनली आहे. कंपनीने ही कार गेल्या वर्षीच बाजारात आणले होते. लॉन्च झाल्यामुळे अनेकांना खूप आनंद झाला.
कारण ही सर्वात किफायतशीर आणि वैशिष्ट्यांमध्ये सर्वोत्तम कार (Maruti Alto ) आहे. कंपनी या कारवर 25 हजार रुपयांची सूट देत आहे. इतकेच नाही तर वॅगनारवर 29,000 रुपये आणि सेलेरिओवर 5.000 ते 59.000 रुपयांपर्यंत सूट आहे.
मारुती अल्टो K10 इंजिन आणि किंमत
Alto K10 मध्ये 1.0L K10 इंजिन आहे जे 66 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. जे 24.39 kmpl आहे. त्याच वेळी, नवीन Alto K10 ची किंमत 3.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. Vxi+ या टॉप मॉडेलची किंमत 5.83 लाखांपर्यंत आहे.
मारुती अल्टो K10 वैशिष्ट्ये
या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 7.0-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटी, पॉवर विंडो बटणे, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल मिरर आणि मॅन्युअल एअर कंडिशनिंग आहे.