Maruti Electric Car : मारुतीची सर्वात लहान इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर धावेल 230 किमी, जाणून घ्या फीचर्स

Ahmednagarlive24 office
Published:
Maruti Electric Car

Maruti Electric Car : बाजारात मारुतीच्या जवळपास सर्वच कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी असते. या कारच्या किमतीदेखील जास्त असतात. कंपनी आपल्या प्रत्येक कारमध्ये वेगवेगळे फीचर्स उपलब्ध करून देत असते. कंपनी आपली एक Electric Car आणली आहे.

सुझुकी eVX ही मिनी इलेक्ट्रिक कार आणली आहे. ती एका चार्जवर 230 किमी अंतर कापते. Suzuki eVX लाँच केल्यावर 40-60PS पॉवर आणि 100-150Nm टॉर्क जनरेट करू शकते. जाणून घ्या सुझुकी eVX फीचर्स.

मारुती सुझुकी eVX डिझाइन

मारुती सुझुकीचा असा दावा आहे की eVX लोकांना दररोज वापरता यावे यासाठी डिझाइन केले असून कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर eVX ची लांबी 3395mm, रुंदी 1475mm आणि उंची 1620mm इतकी आहे. कंपनीची ही कार 421 मिमी लांब, 30 मिमी अरुंद आणि एमजी कॉमेटपेक्षा 20 मिमी लहान आहे. MG EV प्रमाणे eVX मध्ये C-आकाराचे LED DRL आणि बंपर, साइड स्कर्ट आणि अलॉय व्हील्सवर पिवळ्या रंगाच्या हायलाइटसह बंद लोखंडी जाळी मिळते.

eWX मागील डिझाइन

दरम्यान, कंपनीने अजूनही eVX चे मागील डिझाइन उघड केले नसून तिचे इंटीरियर देखील लपवून ठेवले आहे. 25 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जपान मोबिलिटी शोमध्ये या कारचे डिझाइन स्पष्ट केले जाऊ शकते.

सुझुकी eVX EV रेंज

कंपनीकडून अजूनही eVX च्या EV पॉवरट्रेन फीचर्सचा खुलासा करण्यात आला नाही. तसेच कंपनीचं असा दावा आहे की eVX पूर्ण चार्ज केली तर 230 किमीचा पल्ला गाठू शकते. जी 230 ची श्रेणी देईल. ही श्रेणी MG Comet EV सारखीच असेल. त्यामुळे मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेत MG Comet EV विरुद्ध eVX सादर करू शकते. Suzuki eVX लाँच केल्यावर 40-60PS पॉवर आणि 100-150Nm टॉर्क जनरेट करू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe