Maruti Suzuki Car Export: देशातील सर्वात लोकप्रिय आणि मोठी कंपनी मारुती सुझुकी आपल्या स्वस्त कार्समुळे मागच्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीची कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देते.
तुम्ही देखील मारुतीची नवीन कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये एका जबरदस्त आणि स्वस्त कारबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला सांगतो मारुतीची ही कर फक्त देशात नाहीतर परदेशात देखील धुमाकूळ घालत आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही येथे मारुती सुझुकी बलेनोबद्दल बोलत आहोत. देशात मागच्या महिन्यात सर्वाधिक विकली जाणारी ही कार आहे. याची 6.49 लाख रुपयांपासून भारतात किंमत सुरु होते. हे पण जाणून घ्या मागच्या महिन्यात सर्वात मोठी निर्यात केलेली कार आहे.चला तर जाणून घ्या मागच्या महिन्यात निर्यात केलेल्या टॉप 10 कार्सबद्दल संपूर्ण माहिती.
नोव्हेंबर 2022 मध्ये कार निर्यात
नोव्हेंबर 2022 मध्ये मारुती सुझुकी बलेनोची सर्वाधिक निर्यात होती, एकूण 5,221 युनिट्सची निर्यात झाली. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Hyundai Grand i10 Nios होती, ज्यांच्या एकूण 4374 युनिट्स परदेशी बाजारात पाठवण्यात आल्या होत्या.
निसान सनी 4,262 युनिट्सच्या निर्यातीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर Kia Seltos 4195 युनिट्सच्या निर्यातीसह चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर ह्युंदाई व्हर्ना 3940 युनिट्ससह निर्यातीच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. यानंतर सहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकी डिझायर होती, तिची 3948 युनिट्स निर्यात झाली.
त्याच वेळी, ह्युंदाई ऑरा 3014 युनिट्सच्या एकूण निर्यातसह सातव्या क्रमांकावर आहे, तर मारुती सुझुकी एस-प्रेसो आठव्या क्रमांकावर आहे, एकूण 2464 युनिट्स विदेशात पाठवल्या आहेत. मारुती सुझुकीचे मॉडेलही नवव्या क्रमांकावर राहिले, हे मॉडेल स्विफ्ट आहे, ज्याने एकूण 2290 युनिट्सची निर्यात केली. किआ सॉनेट दहाव्या क्रमांकावर होते, त्याची 1947 युनिट्स निर्यात झाली आहेत.
हे पण वाचा :- Maruti Electric SUV : जबरदस्त ! मारुतीची ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक SUV देणार तब्बल 500km रेंज ; ‘या’ दिवशी होणार लाँच