Maruti Suzuki CNG Car : ‘या’ सीएनजी कारनं गाजवलंय अख्ख मार्केट! शक्तिशाली फीचर्स आणि मायलेजसह किंमत आहे फक्त..

Ahmednagarlive24 office
Published:

Maruti Suzuki CNG Car : देशात इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार बाजारात लाँच करत आहेत. वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सर्वच कंपन्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी कार बनवण्यावर भर देत आहेत.

देशातील सर्वात लोकप्रिय कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने आपली काही दिवसांपूर्वी Ertiga ही सीएनजी कार लाँच केली होती. याच कारने बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. उत्तम फीचर्ससह या कारची किंमत खूप कमी आहे.

मारुतीची सीएनजी कार

मारुती सुझुकी Ertiga च्या VXI ट्रिममध्ये CNG पर्याय सध्या उपलब्ध आहे. कंपनीकडून या कारमध्ये 1462 cc चे इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन 5500 rpm वर 86.63 Bhp पॉवर आणि 4200 rpm वर 121.5 Nm पीक टॉर्क निर्माण करते. इतकेच नाही तर ही कार 26.11 किमी मायलेज देते.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

कंपनीकडून या कारमध्ये उत्कृष्ट फीचर्सही देण्यात आली आहेत. यात मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर अॅडजस्टेबल ओआरव्हीएम, टच स्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, अलॉय व्हील्स, फ्रंट फॉग लाइट्स, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि फ्रंट तसेच रिअर पॉवर विंडो यासारखे शानदार फीचर्स मिळतात.

किती आहे किंमत?

कंपनीकडून या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत सुमारे 10.44 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही एक उत्तम कार घेण्याच्या विचारात असाल, तर मारुती सुझुकीची ही शक्तिशाली कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe