Maruti Suzuki : जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी खुखबर आहे. कारण मारुती सुझुकी कारवर सूट देत आहे. डिसेंबर 2022 मध्ये, कंपनी अल्टो (Alto K10), Wagon R (Wagon R), Celerio (Celerio), Dzire (Dzire) आणि Swift (Swift) या नुकत्याच लाँच झालेल्या कारवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे.
जाणून घ्या सविस्तर यादी
मारुती सुझुकी अल्टो K10
मारुती सुझुकी अल्टो K10 मॉडेलच्या कारवर सूट देत आहे. मारुती सुझुकी आपल्या Alto K10 च्या मॅन्युअल व्हेरिएंटवर 52,000 रुपयांची सूट देत आहे. याच मॉडेलच्या कारच्या AMT ट्रिम्सवर 22,000 रुपयांची सूट मिळत आहे. कंपनी Alto K10 CNG वर 45,000 रुपयांची सूट देत आहे.
मारुती सुझुकी सेलेरियो (सेलेरिओ)
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात Maruti Suzuki Celerio CNG च्या खरेदीवर मोठी बचत करण्याची संधी आहे. कंपनी डिसेंबर 2022 मध्ये या कारवर 45,000 रुपयांची सूट देत आहे.
पेट्रोल इंजिन असलेल्या Maruti Suzuki Celerio च्या मॅन्युअल वेरिएंटवर 36,000 रुपयांची सूट मिळत आहे. Celerio मॉडेलच्या AMT ट्रिम आवृत्तीच्या खरेदीवर कंपनी या महिन्यात 21,000 रुपयांची सूट देत आहे.
मारुती सुझुकी वॅगन आर
मारुती आपल्या सर्वाधिक मागणी असलेल्या कारवरही सूट देत आहे. या महिन्यात वॅगन आरच्या मॅन्युअल व्हेरिएंटच्या खरेदीवर 42,000 सूट. डिसेंबर 2022 मध्ये, या मॉडेल कारच्या AMT आवृत्तीवर 22,000 ची सूट मिळत आहे. या महिन्यात, सीएनजी आवृत्तीच्या खरेदीवर ग्राहकांना 22,000 हजार रुपयांची सूट देत आहे.
मारुती सुझुकी स्विफ्ट आणि डिझायर
कंपनीच्या सर्वात आवडत्या कारपैकी एक असलेल्या स्विफ्टवर या महिन्यात 32,000 रुपयांची सूट मिळत आहे. मारुती सुझुकीने डिसेंबर 2022 मध्ये AMT सह स्विफ्टच्या सर्व प्रकारांवर ही सूट दिली आहे.
सीएनजी कारवर भरघोस सूट उपलब्ध आहे. सीएनजी श्रेणीतील मारुती सुझुकी स्विफ्ट सीएनजी कारच्या खरेदीवर कंपनी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात ग्राहकांना 15,000 रुपयांची सूट देत आहे.