Maruti suzuki : मारुती सुझुकीच्या अनेक कार्स भारतीय बाजारात धुमाकूळ घालत असतात. कंपनी आपल्या सर्वच कारमध्ये शानदार मायलेज तसेच अप्रतिम फीचर्स देत असते. त्यामुळे या कारच्या किमतीही जास्त असतात. परंतु तुम्ही आता खूप कमी किमतीत मारुतीची कार खरेदी करू शकता.
सर्वात महत्त्वाची म्हणजे कंपनीची सर्वात जास्त विक्री करणारी कार ह्युंदाई तसेच टाटा मोटर्सच्या कार्सना कडवी टक्कर देत आहे. या कारमध्ये कंपनीने अनेक सेफ्टी फिचर दिले आहेत. तसेच मायलेजचा विचार केला तरं यात कंपनीने 30KMPL मायलेज दिले आहे.

विकले सर्वात जास्त युनिट
मार्च महिन्यात मारुती बलेनोच्या 16,168 युनिट्सची विक्री झाली असून मारुती बलेनोची प्रतिस्पर्धी असणाऱ्या Hyundai i20 ने मार्चमध्ये 6,596 युनिट्सची विक्री केली आहे. तर टाटा अल्ट्रोजने चांगली विक्री केली नाही. Honda Jazz सुद्धा या सेगमेंटमध्ये होती, मात्र ती बंद केली आहे.
जाणून घ्या कारचे फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनी या कारमध्ये हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प, एलईडी टेललॅम्प, कीलेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग, ऑटो क्लायमेट कंट्रोल, रिअर डिफॉगर, ऑल पॉवर विंडो, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, कनेक्टिव्हिटी फीचर्स तसेच सराउंड सेन्सर आर्किम्स ऑडिओ सिस्टम देत आहे. इतकेच नाही तर यात हेड-अप-डिस्प्ले, इंटिग्रेटेड टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, ओव्हर द एअर यासारख्या फीचर्सचा समावेश असणार आहे.
मिळत आहेत अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्स
कारच्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात 6 एअरबॅग्ज, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमाइंडर, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ब्रेक असिस्ट, सीट-बेल्ट टेंशनर यांसारखी प्रगत सेफ्टी फीचर्स उपलब्ध आहेत.
कसे असेल इंजिन?
या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या कारमध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आणि सौम्य-हायब्रीड तंत्रज्ञानाचे इंजिन देत आहे. हे इंजिन 89 bhp पॉवर आणि 113 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या इंजिनला 5-स्पीड गिअर बॉक्स आणि AMT युनिटचा सपोर्ट दिला असून कंपनी पेट्रोल सोबतच ही कार CNG पर्यायात देत आहे. या कारचे मायलेज 22.94 kmpl ते 30.61 km/kg इतके आहे.
किती असणार किंमत?
किंमतीबाबत विचार केला तर कंपनीच्या या कारची सिग्मा, डेल्टा, डेल्टा सीएनजी, झेटा, झेटा सीएनजी आणि अल्फा या सहा प्रकारांमध्ये विक्री करण्यात येत आहे प्रकारानुसार, मारुती बलेनोची किंमत 6.61 लाख ते 9.69 लाख रुपये इतकी आहे.