Car Discount Offers : मारुती सुझुकीच्या कारवर भन्नाट ऑफर मिळत आहे. त्यामुळे कार खरेदीदारांच्या पैशाची बचत होत आहे. कंपनीने त्यांच्या ३ कारवर जबरदस्त ऑफर लावली आहे त्यामुळे ग्राहकांना ६५ हजारांपर्यंत सूट मिळत आहे.
या जानेवारी महिन्यात, मारुती तिच्या नेक्सा श्रेणीतील काही मॉडेल्सवर सवलतीच्या ऑफर देत आहे – इग्निस, बलेनो आणि सियाझ. त्यांच्या 2022 (MY22) मॉडेल आणि MY23 या दोन्ही मॉडेलवर ऑफर आहेत.
तथापि, गेल्या वर्षीच्या मॉडेलमध्ये जास्त सवलत आहे तर MY23 मॉडेलमध्ये कमी सूट आहे. MY22 मॉडेल्सवर रोख सवलत फक्त 16 जानेवारी 2023 पर्यंत वैध आहे, तर MY23 मॉडेल्सवर संपूर्ण महिनाभर ऑफर मिळतील.
मारुती सियाझ ऑफर
Maruti Ciaz (MY22) वर 35,000 रुपयांपर्यंत रोख सूट आहे. MY23 मॉडेलवर रोख सवलत नाही. त्याच वेळी, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट अनुक्रमे रु. 25,000 आणि रु. 5,000 पर्यंत आहे.
अशा प्रकारे, MY22 मॉडेलवर एकूण 65,000 रुपये आणि MY23 मॉडेलवर 30,000 रुपयांचा लाभ मिळू शकतो. कारची किंमत 8.99 लाख रुपयांपासून 11.98 लाख रुपयांपर्यंत आहे.
मारुती बलेनो ऑफर
ऑफर फक्त मारुती बलेना MY22 वर वैध आहे. यावर फक्त 15,000 रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. ही ऑफर फक्त टॉप अल्फा एमटी प्रकारावर आहे. त्याच्या MY23 मॉडेलवर कोणतीही ऑफर नाही. मारुती बलेनोची किंमत ६.४९ लाख ते ९.७१ लाख रुपये आहे.
मारुती इग्निस ऑफर
मारुती इग्निसवर 30,000 रुपयांपर्यंत (MY22) आणि 15,000 रुपयांपर्यंत (MY23) रोख सूट आहे. त्याच वेळी, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूट अनुक्रमे रु. 15,000 आणि रु. 5,000 पर्यंत आहे.
अशा प्रकारे, MY22 मॉडेलवर एकूण रु.50,000 चा लाभ आणि MY23 मॉडेलवर रु.35,000 चा एकूण लाभ दिला जात आहे. मारुती इग्निसची किंमत ५.३५ लाख ते ७.७२ लाख रुपये आहे.