Maruti WagonR : जर तुम्ही कमी किमतीत कार खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. कारण तुम्ही आता मारुतीची काही दिवसांपूर्वी लाँच झालेली वॅगनआर कार खरेदी करू शकता.
तुम्ही मिळत असणाऱ्या ऑफरमुळे ही कार अवघ्या 48 हजारात खरेदी करू शकता. बाईकच्या किमतीत कर खरेदी करण्याची सुवर्णसंधी आता तुमच्याकडे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे ही कार लवकरात लवकर खरेदी करा.
कंपनीकडून या कारचे बेस मॉडेल 5,54,500 रुपयांच्या प्रारंभिक एक्स-शोरूम किमतीत सादर करण्यात आले आहे. त्याची ऑन-रोड किंमत 6,65,939 रुपये इतकी आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला 6.65 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. परंतु तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला केवळ 48,000 रुपयांना खरेदी करू शकता. बजेट सेगमेंट कारवर आकर्षक फायनान्स प्लॅन उपलब्ध आहे.
जाणून घ्या फायनान्स प्लॅन
ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरचा विचार करायचा झाला तर तुम्हाला मारुती वॅगनआरचे बेस मॉडेल खरेदी करण्यासाठी बँक 9.8 टक्के वार्षिक व्याजदराने 6,17,939 रुपयांचे कर्ज देत आहे.
त्यानंतर तुम्हाला डाउन पेमेंट म्हणून ४८ हजार रुपये कंपनीकडे जमा करावे लागणार आहेत. ही कार घेण्यासाठी तुम्हाला 5 वर्षांसाठी कर्ज मिळत असून तुम्ही प्रत्येक महिन्याला13,069 रुपये EMI भरून परतफेड करता येईल.
जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
या कारमध्ये कंपनीकडून तीन सिलेंडर 998 सीसी इंजिन बसवण्यात आले आहे. ज्याची क्षमता जास्तीत जास्त 65.71 bhp आणि पिकअप टॉर्क 89 Nm जनरेट इतकी आहे. इतकेच नाही तर तुम्हाला 5 स्पीड गिअरबॉक्सही पाहायला मिळणार आहे. ही कार एका लिटर इंधनात 24.35 किलोमीटरपर्यंत धावेल असा दावा कंपनीने केला आहे. या कारमध्ये तुम्हाला अनेक आधुनिक फीचर्स पाहायला मिळतील.