Maruti EV : लवकरच मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार

Maruti EV : नुकत्याच ग्रेटर नोएडा पार पडलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक कंपन्यांनी आपली कार सादर केली. यावेळी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली होती.

या कारची झलक दाखवून कंपनीने आपल्या चाहत्यांना एकप्रकारे गिफ्टच दिले आहे. लवकरच ही कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसणार आहे. कंपनीने यात जबरदस्त फीचर्स दिली आहे. लाँच झाल्यांनतर ही कार इतर कंपन्यांना टक्कर देईल यात काही शंकाच नाही.

लवकरच येणार इलेक्ट्रिक कार

नुकताच ऑटो एक्स्पो 2023 पार पडला. यात मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कन्सेप्ट एसयूव्ही सादर केली होती. अशातच आता सुझुकीकडून अशी माहिती दिली आहे की सन 2024 पर्यंत भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक उत्पादन लाँच केले जाणार आहे.

असा आहे कंपनीचा प्लॅन

मारुतीची मूळ कंपनी असणाऱ्या सुझुकी कडून असे सांगण्यात आले आहे की 2030 पर्यंत कंपनी सहा इलेक्ट्रिक वाहने सादर करणार आहे. तसेच फक्त इलेक्ट्रिक वाहनांचे नाही तर सीएनजी, इथेनॉल, फ्लेक्स फ्युएल कार आणि बायोगॅस यांसारख्या इंधनावरील कारवरही काम करणार आहे.

असा असणार पोर्टफोलिओ

कंपनीने पुढे असे म्हटले आहे की FY2030 पर्यंत, संपूर्ण पोर्टफोलिओमध्ये बॅटरी EV चा वाटा 15 टक्के, तर ICE वाहनांचा वाटा 60 टक्के असणार आहे. तसेच हायब्रिड इलेक्ट्रिक वाहनांचा वाटा 25 टक्के असणार आहे.

ईव्ही उद्योगात होत आहे वाढ

देशात इलेक्ट्रिक वाहनांना सतत चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत आपली अनेक इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत. यात Tata, Mahindra, MG, BYD, Mercedes, Audi, BMW सारख्या कार कंपन्यांशिवाय Hero Vida, Ola, Ather, TVS, Revolt, Torque, Joy e-bike या दुचाकी उत्पादक कंपन्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe