अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- केंद्र आणि राज्य आर्थिक संकटात असताना शहराच्या विकासाचा गाडा आपण येथपर्यंत आणला. वडील खासदार गोविंदराव आदिक यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिने प्रामाणिक करण्याचे प्रयत्न करत आहे.
अनेक छोटी-मोठी विकासाची कामे करून शहराला नावारूपास आणण्याचे काम आपल्या हातून झाले आहे. सर्वांच्या विश्वासास पात्र ठरेल, असे भरीव काम केल्याचा आपल्याला विशेष अभिमान वाटतो,असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून गेली पाच वर्ष पूर्ण केल्याबद्दल बोलत होत्या. त्या म्हणाल्या, जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली. शहराच्या विकासाला चालना देण्याचे काम मी पूर्ण निष्ठेने केले आहे.
कोरोनामुळे जग थांबले असताना तसेच केंद्र व राज्य आर्थिक संकटात सापडले असतानाही या शहराचे प्रश्न थांबवले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या नियोजनामुळे या शहराला अनेक विभागांकडून भरीव निधी आणता आला.
गेली पाच वर्षे या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आपण प्रामणिकपणे केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे सर्वात मोठे काम केले आहे. ‘घर तेथे रस्ता’ ही संकल्पना राबवताना शहरात कोणी रस्त्यापासून वंचित राहणार नाही याची विशेषदक्षता घेण्यात आल्याचेही आदिक म्हणाल्या.
रस्ते वीज पाणी या बरोबरच शहर स्वच्छते बाबत आपण सातत्याने विशेष काळजी घेतली आहे. शहराचे विविध प्रश्न सोडवत असताना आपण त्यात कधीही राजकारण केले नाही.
गोविंदराव आदिकांच्या समाजकारणाचा वारसा यापुढेही शहरात रुजवण्यात येईल. सर्वसामान्यांची साथ मिळाल्याने आपल्याला या शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याची नगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून मोठी संधी मिळाली.
यापुढेही शहराला विकासापासून कधीच वंचित ठेवले जाणार नाही, असेही त्या म्हणाल्या. शहरातील उर्वरित प्रश्न सोडवणे ही आपली जबाबदारी असून शहराला अजून बरेच पुढे न्यायचे असून त्यासाठी राजकीय साथ मिळणे गरजेचे आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम