राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले मला याचे आश्चर्य वाटते…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :-   दहा अर्थसंकल्प झाले पण नगर-वांबोरी रस्त्यासाठी तरतूद केली नाही, याचे मला आश्चर्य वाटते. मी ज्यावेळी शासनाला यादी कळवली त्यावेळी हा रस्ता प्रथम क्रमांकावर लिहिला होता.

या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत असला तरी मला ठेकेदाराचे नाव माहित नाही. मागच्यांसारखे ठेकेदार भेटायला आलेत का? हे मी त्या अर्थाने बोललो नाही, असा टोला नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला.

वांबोरी-नगर रस्त्याच्या कामाचा शुभारंभा मंत्री तनपुरे यांच्या हस्ते सोमवारी झाला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, माजी सरपंच कृष्णा पटारे, नितीन बाफना, किसन जवरे,

उपसरपंच मंदा भिटे, रघुनाथ झिने, एकनाथ ढवळे आदी उपस्थित होते. तनपुरे म्हणाले, नगरला अनेक अडचणी होत्या, नगर-वांबोरी रस्त्याचीही मोठी अडचण होती. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग आहे, अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करता येते.

मी आमदार झाल्यानंतर अर्थसंकल्पात या रस्त्याचे नाव प्रथम क्रमांकावर दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली. पण मला आश्चर्य वाटते, यापूर्वी दहा ते पंधरा अर्थसंकल्प झाले त्यात या रस्त्यासाठी तरतूद का झाली नाही.

पुढे कोरोनामुळे लाॅकडाऊन होऊन राज्याचे आर्थिक उत्पन्न थांबले होते. कर्ज काढून पगार करावे लागले. तसेच मंजुर कामे थांबवावी लागली होती. आता पण आता या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला.

या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरण करायचे आहे. मला ठेकेदाराचे नाव माहित, मागच्यांसारखे आम्ही ठेकेदार भेटायला आले का हे विचारणार नाही, असे त्यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe