Ahmednagar Crime : अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्यास २४ तासात अटक

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Crime : राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याबाबत तसेच कोपरगांव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून ल्याबाबत राहुरी व कोपरगांव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्याचा समांतर तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना २४ तासात अटक केली आहे.

सदर दोन्ही घटना अत्यंत संवेदनशिल असल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर यांना पथक नेमुन पिडीत अल्पवयीन मुलीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.

श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमलदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करत पिडीत अल्पवयीन मुलगी व दोन्ही आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना देवून पथकास तात्काळ रवाना केले.

पथक प्रथम राहुरी येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी शाहनवाज शेख याचा शोध घेत असताना तो बीड येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने पथकाने बीड येथे नेमणुकीस असलेले पोना मनोज वाघ यांना मदतीस घेवून आरोपीच्या ठावठिकाणा माहिती प्राप्त करून आरोगी शाहनवाज असिफ शेख (रा. बांबोरी, ता. राहुरी) हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील तपासाकामी राहूरी पोलीस स्टेशन येथे हजर केले.

दुसरे पथक कोपरगांव शहर येथे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी याचा प्रथम पुणे लोणावळा येथे शोध घेतला.

परंतु ते नवी मुंबई येथील वाशी या ठिकाणी असल्याबाबत माहिती प्राप्त होताच पथकाने वाशी पोलीस स्टेशनचे पोसई निलेश बारसे यांना मदतीस घेवून पिडीत व आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त करून पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी तौफिक मिटु पठाण (रा.बोधेगाव, ता. शेवगाव) हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe