Pan Card Tips : पॅन कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र आहे. प्रत्येक आर्थिक कामासाठी तुम्हाला आता पॅन कार्ड बंधनकारक केले आहे.
तुम्ही अजून पॅन कार्ड काढले नसेल तर ते कधीही काढू शकता. परंतु, अनेकांच्या पॅन कार्डमध्ये चूक आढळते. जर तुमच्याही पॅन कार्ड चूक झाली असेल तर काळजी करू नका, तुम्ही तंटे घाबसल्या अपडेट करू शकता.
फॉलो करा या स्टेप्स
- जर तुम्हाला तुमचे पॅन कार्ड अपडेट करायचे असेल तर प्रथम NSDL ई-गव्हर्नन्सच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर सेवा विभागात जा.
- आता तुम्हाला सेवा विभागातील पॅन कार्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि पॅन डेटा बदला/सुधारणा करा वर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन प्रकार ड्रॉप डाउन मेनूवर जाऊन विद्यमान पॅन डेटामध्ये बदल/सुधारणा किंवा पुनर्मुद्रण पॅन वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला ड्रॉप डाउन मेनूमधून पॅन कार्ड प्रकार निवडून तपशील भरावे लागेल.
- त्यामध्ये तुमचे नाव, जन्मतारीख, ईमेल आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. यानंतर फॉर्मसह कॅप्चा प्रविष्ट करून तो फॉर्म सबमिट करा.
- तुम्ही फॉर्म सबमिट केल्या नंतर, तुमची विनंती नोंदणीकृत केली जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेल आयडीवर टोकन नंबर आणि लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक करून तुम्ही थेट पॅन अपडेट या पेजवर याल.
- आता तुम्हाला विनंती केलेली माहिती प्रविष्ट करावी लागेल आणि नंतर पुढील बटणावर क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि पैसे भरावे लागतील.
- पेमेंटसाठी तुम्ही डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंग आणि क्रेडिटकिंवा डेबिट कार्डचा वापर करू शकता.
- पेमेंट कन्फर्म झाल्यावर तुम्हाला एक पोचपावती स्लिप मिळेल. त्यानंतर ही स्लिप प्रिंट करून घ्या आणि NSDL e-Gov च्या दिलेल्या पत्त्यावर छायाचित्र आणि स्वाक्षरी सारख्या विनंती केलेल्या माहितीसह पाठवा.
- पडताळणीनंतर तुमची माहिती अपडेट करण्यात येईल.
जर तुमच्याही पॅन कार्ड काही चूक झाली असेल तर ती आत्ताच घाबसल्या या स्टेप्स फॉलो करून अपडेट करून घ्या नाहीतर तुम्ही कधीही आर्थिक कचाट्यात सापडू शकता.