आमदार रोहित पवार प्रसिद्धी मिळवत आहेत जनता त्यांना जागा दाखवून देईल …

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- मी मंजूर केलेली नळ पाणीपुरवठा योजना जाणीव पूर्वक दोन वर्षे प्रलंबित ठेवत जनतेला स्वच्छ पाण्यापासून वंचित ठेवले. स्वतःला श्रेय घेण्यासाठी व आम्ही मंजूर केलेल्या कामाचे भुमिपूजन करून आमदार रोहित पवार प्रसिद्धी मिळवत आहेत.

नगरपरिषद निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवून देईल, अशी टीका माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी पञकार परिषदेत केली जामखेड शहर व नगरपरिषद हद्दीतील वाड्यांसाठी आमदार पवार यांनी १३८.८४ कोटींची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर केल्याचे सांगितले. यावरून राजकीय श्रेय वादाची लढाई सुरू झाली.

माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी दि. ९ रोजी पत्रकार परिषद घेऊन ही योजना मी मंजूर केली आहे, असा दावा केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, जिल्हा सरचिटणीस मनेश मासाळ,

जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, भगवान मुरुमकर, रवी सुरवसे, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, बिभीषण धनवडे, सोमनाथ राळेभात, अमित चिंतामणी, पांडुरंग उबाळे, सलिम बागवान,

अादी उपस्थित होते. राम शिंदे म्हणाले, जामखेडची पाणीपुरवठा योजना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मी मंजूर करून आणली. या योजनेसाठी मी अहोरात्र प्रयत्न केले.

मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मतदारसंघात सिमेंट बंधारे बांधली. तालुका टँकरमुक्त झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe