मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, घडला अनुचित प्रकार; केली गाडीची तोडफोड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुणे दौरा सुरु आहे.

राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे मनसेला चांगलाच धक्का बसला आहे.

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना पिंपरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (Pimpri Chinchwad MNS) महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ (Anita Panchal) यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.

तीन जणांनी मोटारसायकलवर येऊन पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर असतानाच हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुरुवारी पहाटेच्या सुमारास गाडीची कोयत्याने वार करत तोडफोड करण्यात आली आहे. ३ अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.

याच रागातून आपल्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप अनिता पांचाळ यांनी केला आहे. यामध्ये गाडीचे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News