Mobile Number: जुना बंद करून नवा मोबाईल नंबर घेतला असेल तर पटकन करा ‘हे’ काम नाहीतर ..

Ahmednagarlive24 office
Published:

Mobile Number: आज अनेक लोक आपल्या मोबाईलच्या मदतीने घरी बसल्या बसल्या हजारो रुपयांचे व्यवहार करत आहे. तर काही जण आज या मोबाईलच्या माध्यमातून शॉपिंग करत आहे, जेवण्याची व्यवस्था करत आहे.

या मोबाईलमुळे आज जवळपास संपूर्ण काम आरामात होऊ शकतात. मात्र कधी कधी काही लोक आपल्या फोनमध्ये असलेला नंबर बदलतात आणि नवीन नंबर वापरतात. जर तुम्ही देखील जुना नंबर बंद करून नवीन नंबर वापरत असला तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.

नवीन नंबर घेतल्यानंतर काही लोक काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये जुना मोबाईल नंबर लिंक केला तरी ते नवीन नंबर अपडेट करायला विसरतात. अशा परिस्थितीत लोकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

नंबर अपडेट करा

जर मोबाईल नंबर बदलला असेल तर नवीन नंबर तुमच्या महत्वाच्या खात्यात अपडेट करावा. यामध्ये बँक खाते, आधार कार्ड, पीएफ खाते आणि इतर महत्त्वाच्या खात्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक अपडेट करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डमध्ये अपडेट केला नसेल तर ते त्वरित पूर्ण करा.

Smartphone Tricks: Calls will now come even when there is no network in the mobile

मोबाईल नंबर आधार कार्डशी कसा लिंक करायचा?

तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट द्या.

आधार सुधारणा फॉर्म भरा.

यानंतर, तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तो भरा.

आधार एक्झिक्युटिव्ह प्रमाणीकरणासाठी तुमचे बायोमेट्रिक्स घेतो आणि शेवटी फॉर्म सबमिट करतो.

तुमच्या विनंतीबद्दल अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) स्लिप ठेवा, एक्झिक्युटिव्ह तुम्हाला तुमच्या विनंतीची पोचपावती देईल.

आधार अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी अपडेट रिक्वेस्ट नंबरचा वापर केला जाऊ शकतो. लिंकिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला आधार ओटीपी मिळेल.

आधार अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही UIDAI च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करू शकता.

हे पण वाचा :- Cyber Fraud News : धक्कादायक ! 499 रुपयांच्या पेमेंटच्या नावाखाली बसला 1.22 लाखांचा फटका ; जाणून घ्या नेमकं प्रकरण

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe