7th Pay Commission : जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मोदी सरकार (Modi Govt) महागाई भत्त्याच्या (DA) वाढीची घोषणा करू शकते.
असे झाल्यास या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के इतका होईल. अनेक दिवसांपासून हे कर्मचारी महागाई भत्त्याची वाट पाहत होते.
वास्तविक, केंद्र सरकारच्या (Central Govt) अखत्यारीत काम करणारे कर्मचारी आणि पेन्शनधारक (pensioner) महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) वाढण्याची वाट पाहत आहेत.
वृत्तांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
कर्मचार्यांसाठी DA कधी वाढेल
DA/DR बद्दल बोलायचे झाले तर, साधारणतः मार्च आणि सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारकडून चांगली बातमी येते. सप्टेंबर महिना सुरू असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा सरकारकडून कायम आहेत. सणांचा महिनाही जवळ आला आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत अधिक अपेक्षा आहेत.
DA किती वाढू शकतो
केंद्रीय कर्मचाऱ्यांना आशा आहे की, यंदा मोदी सरकार त्यांच्याकडे अधिक लक्ष देईल. सरकार डीए 34 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. पेन्शनधारकांनाही सरकारकडून अशीच दरवाढ अपेक्षित आहे.
DA/DR ची गणना
सरकार सहसा सहा महिन्यांच्या अंतरानंतर डीए/डीआरचे दर सुधारण्याचे काम करते. महागाईमुळे मासिक वेतन/पेन्शन मालमत्तेच्या मूल्यातील तोटा भरून काढण्यासाठी हे केले जाते.
DA/DR दर अनुक्रमे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मदत करण्यासाठी लागू आहेत. DA/DR बद्दल बोलायचे झाले तर ते 7 व्या वेतन आयोगाने सुचविलेल्या सूत्राच्या आधारे मोजले जाते. 2006 पासून, महागाई भत्ता नवीन गणनेवर आहे.