ऑनलाईन फसवणूक झाल्यास पैसे मिळतात परत; कसे…

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- येथील सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीच्या अनेक तक्रारी दाखल होतात. अलिकडच्या काळात यामध्ये वाढ झाली आहे. मात्र सायबर पोलिसांकडून त्यावर चांगले काम सुरू असून लोकांचे गेलेले पैसे परत मिळून दिले जात आहे.

फोन-पे करताना दुसर्‍याच्या खात्यावर गेलेले 50 हजार रूपये सायबर पोलिसांमुळे परत मिळाले. तसेच क्रेडिट कार्डमधून आलेल्या बनावट फोनमुळे फसवणूक झालेल्या 59 हजार रूपयांपैकी 30 हजार 200 रूपये फिर्यादीला परत मिळून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

या दोन्ही घटना अहमदनगर शहरात घडल्या आहे. दरम्यान ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास फसवणूकीची रक्कम परत प्राप्त होत आहे.

अहमदनगर येथील युवराज भवर हे त्यांच्याशी संबंधीत व्यक्तीला फोन-पेद्वारे 50 हजार रूपये खात्यावर पाठवित होते. तांत्रिक अडचणीमुळे त्यांचे 50 हजार रूपये दुसर्‍या खात्यावर गेले.

त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे गेले त्या व्यक्तीचा सायबर पोलिसांशी शोध घेऊन भवर यांचे पैसे परत मिळून दिले.

दुसरी फसवणूक के्रडिट कार्डद्वारे झाली होती. रोहित जोशी यांना एक फोन आला. क्रेडिटकार्ड विषयी माहिती देत त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागितला.

त्याद्वारे जोशी यांच्या खात्यातील 59 हजार रूपये काढून घेतले. त्यांनी तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले, उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अभिजित अरकल, राहुल गुंड्डू यांनी तांत्रिक तपास करत जोशी यांच्या गेलेल्या रक्कमेपैकी 32 हजार 200 रूपये त्यांना परत मिळून दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe