ATM cash withdrawal : ATM मधून पैसे निघाले नाहीत परंतु खात्यातून कट झाले, लगेच करा ‘हे’ काम

ATM cash withdrawal : लोक पूर्वीसारखे आता पैसे काढण्यासाठी किंवा पॆसे भरण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहत नाहीत. ऑनलाईन किंवा ATM मधून ते व्यवहार करतात.

परंतु, अनेकदा ATM मधून पैसे निघत नाहीत परंतु खात्यातून पैसे कापले जातात. अशावेळी घाबरून न जाऊ नये. तुमचे पैसे पुन्हा तुमच्या बँक खात्यात जमा होतात.

माघारी येतात पैसे, परंतु…

बँकेकडून लगेचच तुम्हाला कळवले जाते की रक्कम तुमच्या खात्यात परत जमा झाली आहे. एटीएममधील तांत्रिक किंवा कॅश आउटेजमुळे, बँक खात्यातून पैसे कापले जातात, परंतु एटीएममधून ते पैसे निघत नाहीत.परंतु, कधी कधी ही रक्कम खूप मोठी असते तेव्हा भीती असते.

लगेच करा हे काम

पैसे थोड्यावेळाने खात्यात येतात. तरीही तुमचे पैसे परत आले नाही, तर तुम्ही बँक कस्टमर केअरला कॉल करू शकता किंवा थेट बँकेच्या शाखेला भेट देऊ शकता. परंतु, तिथेही तुमच्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर तुम्ही RBI ला कळवू शकता

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe