अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2022 :- महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले असताना, स्वतःची चूक झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग करत आहे.
यापेक्षा त्यांनी राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, अशी खरमरीत टीका आमदार मोनिका राजळे यांनी केली. तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये खर्चाच्या चांदगाव, निपाणी जळगाव ते कोरडगाव रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/02/Improve-the-work-in-eight-days-otherwise-intense-agitation-MLA-Monica-Rajales-warning.jpg)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे होते. यावेळी जेष्ठ नेते रामकिसन काकडे, जि. प. सदस्य राहुल राजळे, सभापती गोकुळ दौंड, रवींद्र वायकर, विष्णूपंत अकोलकर, सुभाष केकाण, काकासाहेब शिंदे, माणिक खेडकरे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील निपाणी जळगाव येथे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजने अंतर्गत सुमारे १० कोटी रुपये खर्चाच्या चांदगाव, निपाणी जळगाव ते कोरडगाव रस्ता डांबरीकरण कामांचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे होते. यावेळी जेष्ठ नेते रामकिसन काकडे, जि. प. सदस्य राहुल राजळे, सभापती गोकुळ दौंड, रवींद्र वायकर, विष्णूपंत अकोलकर, सुभाष केकाण, काकासाहेब शिंदे, माणिक खेडकरे आदी उपस्थित होते.
राजळे म्हणाल्या, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकारातून राज्यामध्ये जलयुक्त शिवार योजना यशस्वी पणे राबवण्यात आली.
या योजनेमुळे पाणी साठ्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र आघाडी सरकार भाजपाला बदनाम करण्यासाठी ही योजनाच चुकीची असल्याचा कांगावा करत आहे.
याउलट त्यांनी शेतकऱ्यांच्या बोर व विहिरींचे वाढलेले पाणी तेथे जाऊन पाहायला पाहिजे. वाढलेले पाणी पिकांना सहजपणे देता यावे, यासाठी भारनियमन न करता नियमित वीज पुरवठा सुरू करायला पाहिजे.
भाजपा सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी मतदार संघात मिळाला. अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही भरघोस भरपाई मिळाली नाही
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम