Monkeypox in India : भारतात पुन्हा मंकीपॉक्सचा शिरकाव, विद्यार्थ्यामध्ये आढळली लक्षणे

Published on -

Monkeypox in India : संपूर्ण जगावर मंकीपॉक्स (Monkeypox) या विषाणूमुळे (Virus) भीतीचे सावट पसरले आहे. अशातच कोलकाता (Kolkata) शहरात एका विद्यार्थ्यामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आली आहेत.

काही दिवसांपूर्वी एक विद्यार्थी युरोपियन देशातून परतला होता

या विद्यार्थ्यालाही मंकीपॉक्स असल्याचं समजतं कारण हा विद्यार्थी काही दिवसांपूर्वी युरोपियन (European) देशातून परतला होता. हा तरुण पश्चिम मिदनापूरचा रहिवासी असून आता त्याच्या शरीरावर पुरळ आणि इतर मंकीपॉक्सची लक्षणे (Symptoms) जाणवत आहेत.

यानंतर त्याला कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला वेगळे केले आहे.

हा अहवाल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही, पुणे) कडे पाठवण्यात आला आहे.

अद्यापही लक्षणे संशयास्पद असल्याने नमुना तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) येथे पाठवण्यात आला आहे. तपास अहवाल अद्याप आलेला नाही. रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

त्याच्या घरातील लोकांनाही पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाने सतर्क केले आहे. सध्या स्थानिक आरोग्य विभाग सतर्क आहे. संशयित व्यक्तीचा मंकीपॉक्सचा नमुना तपासणीसाठी पाठवण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News