Tatat Motors Price hike : नेक्सॉनपासून सफारीपर्यंत टाटा मोटर्सने ह्या कार्सच्या किंमतीत केलीय ‘इतकी’ वाढ !

Tatat Motors Price hike :टाटा मोटर्सची वाहने आता महाग होणार आहेत. कंपनीने आपल्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सर्व प्रकार आणि मॉडेल्सच्या आधारे वाहनांच्या किमतीत 0.55 टक्क्यांनी वाढ करणार आहे.

नवीन दर शनिवारपासून (9 जुलै) लागू होतील. टाटाने नेक्सॉन, पंच, सफारी, हॅरियर, टियागो, अल्ट्रोज आणि टिगोरच्या किमती आजपासून वाढवल्या आहेत.वाहने बनवण्याचा खर्च वाढल्याने किमती वाढवण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. गेल्या तीन महिन्यांत टाटा मोटर्सने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. कंपनीने एप्रिल 2022 मध्ये प्रवासी वाहनांच्या किमतीही सरासरी 1.1 टक्क्यांनी वाढवल्या होत्या.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्याचप्रमाणे जानेवारी 2022 मध्ये कंपनीने आपल्या प्रवासी वाहनांच्या किमती 0.9 टक्क्यांनी वाढवल्या होत्या. आजपासून वाढलेल्या किंमतीनंतर टाटाच्या नेक्सॉन, पंच, सफारी आणि टियागोसारख्या गाड्या महाग होणार आहेत. आता ते विकत घेण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील.

आजकाल टाटा मोटर्सची वाहने बाजारात चांगलीच कमाई करत आहेत. 2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीच्या वाहनांच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीच्या जागतिक घाऊक विक्रीत 48 टक्के वाढ झाली आहे. कंपनीने या कालावधीत एकूण 3,16,443 कारची विक्री केली आहे. यामध्ये ‘जॅग्वार लँड रोव्हर’ (JLR) च्या विक्रीच्या आकड्यांचा समावेश आहे.

टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तिमाहीत कंपनीच्या सर्व प्रवासी वाहनांची जागतिक विक्री 2,12,914 युनिट्सपर्यंत वाढली आहे. एका वर्षापूर्वी, आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीत 1,61,780 युनिट्सची विक्री झाली होती.

गेल्या महिन्यात सर्वाधिक पसंतीच्या कार ब्रँडच्या बाबतीत टाटा मोटर्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. जून 2022 मध्ये टाटा कारच्या विक्रीत जून 2021 च्या तुलनेत 87 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

टाटाने गेल्या महिन्यात 45,197 युनिट्स विकल्या, गेल्या वर्षी जून 2021 मध्ये विकल्या गेलेल्या 24,110 युनिट्सच्या तुलनेत. कंपनीच्या Nexon ला सर्वाधिक ग्राहक मिळाले आणि 14,614 कार विकल्या गेल्या.

भारतीय बाजारपेठेत, टाटा मोटर्सने हॅचबॅक, एसयूव्ही आणि सेडान यांसारख्या अनेक सेगमेंटमध्ये अनेक नवीन मॉडेल्स लॉन्च केली आहेत. कंपनीने आपले सर्वात लोकप्रिय एसयूव्ही मॉडेल सफारी बाजारात एका नवीन स्वरूपात आणले आहे. कंपनीने गेल्या महिन्यात एंट्री-लेव्हल एसयूव्ही पंचच्या 10,414 युनिट्स आणि सफारीच्या 1,869 युनिट्सचीही विक्री केली आहे.