चिंताजनक बातमी : देशात मंकीपॉक्सचा शिरकाव, येथे आढला पहिला रुग्ण

Published on -

India News:कोरोनाचे संकट पुरते टळण्याआधीच भारतीयांसाठी चिंताजनक बातमी आली आहे. अतिशय दुर्मिळ आजार असलेल्या मंकीपॉक्स या रोगाचा विषाणूचा शिरकाव आपल्या देशात झाला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्सचा रुग्ण आढळा आहे.

संयुक्त अरब अमीरातीवरुन केरळमध्ये परतलेल्या तरुणाला मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या रुग्णाला उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा रुग्ण १२ जुलैरोजी युएईहून केरळात परतला होता.

त्रिवेंदम विमानतळावर हा व्यक्ती उतरला होता.मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या विषाणूमुळं होतो त्याच विषाणूचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो.

हा विषाणूचा त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होते. लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतं.

रुग्ण बरा झाल्यानंतरही शरिरावर हे डाग तसेच राहतात.प्राण्यांना जर हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संबंध आला तर माणसाच्या शरिरात हा विषाणू प्रवेश करु शकतो. तसंच, रुग्णांचे वापरलेले कपडे किंवा रुग्णांशी थेट संबंध आल्यानंही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत लक्षणे दिसतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe