Monsoon Update : देशात यंदा मान्सूनची स्थिती कशी असणार? हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती, जाणून घ्या सविस्तर

Ahmednagarlive24 office
Updated:
Monsoon Update

Monsoon Update : मे महिना संपत आला तरी राज्यात तापमान सर्वत्र वाढल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याच्या तापमानाने 40 अंशांचा पारा पार केलेला आहे. अनेक ठिकाणी तर हीच परिस्थिती गंभीर आहे. सध्या विदर्भात अवकाळ पाऊस झाला आहे.

असे असताना आता राज्यात मान्सून कधी येणार? कुठे जास्त पाऊस पडणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. आता याच बाबत हवामान विभागाकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. जाणून घेऊयात यंदा राज्यात मान्सून कसा असणार?

उत्तर भारतात दिसून येणार मान्सूनचा प्रभाव

हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आगामी दोन ते तीन दिवस उत्तर भारतात चांगला पाऊस पडणार आहे. दरम्यान या ठिकाणी मार्च आणि मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाला आहे. हे लक्षात घ्या की 1 मार्च ते 25 मे या कालावधीत 12 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

परंतु मान्सूनपूर्व काळात उष्णतेची लाट कमी झाल्याचे आपल्याला दिसत आहे. उत्तर-पश्चिम भारतात मान्सून सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर-पश्चिम भारतात सरासरीच्या 92% पाऊस पडू शकतो.

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार

जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची महत्त्वाची आणि मोठी हवामान खात्याने दिली आहे. या महिन्यात सरासरीच्या 96 % पाऊस अपेक्षित आहे. LPA +/- 4% मार्जिन पाहिले जाणार आहे.

जाणून घ्या टाइमलाइन

देशात मान्सून साधारणपणे 25 मे ते 1 जून दरम्यान सुरू होतो. सध्या केवळ भारतात दक्षिण-पश्चिम मान्सून सक्रिय आहे. त्यामुळे केरळमधूनच मान्सूनची सुरुवात मानली जात आहे. 25 मे ते 1 जून या कालावधीत मान्सून या ठिकाणी पोहोचतो. विलंब 3-6 दिवस पुढे आणि मागे असण्याची शक्यता आहे. त्यानंतर 15 जूनपर्यंत तामिळनाडू, बंगालचा उपसागर, कोकणात मान्सून सक्रिय होणार असून त्यानंतर तो कर्नाटक, मुंबई, गुजरात आणि पश्चिम पट्ट्यात पोहोचतो.

अपेक्षित पाऊस

हवामान खात्याच्या माहितीनुसार, देशभरात सरासरीच्या 96% पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. ही मान्सूनची सामान्य स्थिती आहे असून सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त मान्सूनची 67% शक्यता आहे. त्यामुळे येणारी काही दिवसांत मान्सूनची स्थिती बदलली तर काही बदल पाहायला मिळतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe