अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांत शेतकऱ्यांना बसला आहे. प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार या तीन तालुक्यांत 700 पेक्षा अधिक कुटुंबांना या पावसाचा फटका बसला असून, 300 पेक्षा अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे.
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू झाले आहेत. तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. शेवगाव, पाथर्डी, नगर तालुक्यांना पावसामुळे मोठा फटका बसला.
अनेक घरांचे, नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. तसेच नेवासा तालुक्यात पावसामुळे घोडेगाव, शिरसगाव, सोनई (धनगरवाडी) या तीन गावांत घरांची अंशतः पडझड झाली.
राहुरी तालुक्यात पावसामुळे देसवंडी, राहुरी खुर्द येथे एकूण दोन घराची पडझड झाली. शेवगाव तालुक्यातील आखेगाव, खरडगाव, वरूर खुर्द, वरूर बुद्रूक, भगुर, वडुले बुद्रूक, लांडे व कराड वस्ती, भागात तब्बल सहाशेपेक्षा अधिक कुटुंबांना फटका बसला.
याशिवाय आतापर्यंत 90 जनावरांचा मृत्यू झाला असून 81 जनावरे बेपत्ता आहेत. मृत जनावरांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाथर्डी तालुक्यात पावसामुळे कोरडगाव सोमठाणे, औरंगपूर, पांगोरी पिंपळगाव येथील नदीकाठावरील गावे बाधित झाली आहेत.
कोरडगाव गावातील नागरिकांची स्थानिक पथकाच्या साह्याने एकूण 80 कुटुंबाना फटका बसला. . दरम्यान, याबाबतचा सविस्तर पाहणी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम