Most Expensive Hotels In World : जगातील प्रत्येक देशातील राहणीमान हे वेगवेगळे असते. जगभरातील लोक वेगवगेळ्या देशातील पर्यटन स्थळी भेट देत असतात. त्यावेळी ते राहण्यासाठी हॉटेल्स बुकिंग करतात. प्रत्येक हॉटेल्सच्या एका रात्रीच्या मुक्कामासाठी किमती वेगवेगळ्या असतात.
अनेकजण हॉटेल्सच्या रूम बुक करताना स्वस्त रूम कशी मिळेल याचा विचार करत असतात. मात्र तुम्ही कधी जगातील सर्वात महागड्या हॉटेल्सचा विचार केला आहे का? जगात अशी महागडी हॉटेल्स आहेत ज्यांचा एका रूमचे एका रात्रीचे भाडे तब्बल 83 लाख रुपये आहे.
जगातील 10 सर्वात महागड्या हॉटेल्समध्ये एक रात्र मुक्कामाची किंमत
1. Atlantis The Royal, Dubai
Atlantis The Royal हे जगातील आणि दुबई मधील सर्वात महागडे हॉटेल आहे. या हॉटेलमधील एका रूमचे रात्रीचे भाडे 100,000 US डॉलर आहे. म्हंजसह भारतीय रुपयांमध्ये 83 लाख रुपये आहे.
2. राज पॅलेस, जयपूर
जगातील सर्वात महागड्या हॉटेलमध्ये भारतातील हॉटेलचा क्रमांक लागतो. जयपूरमधील राज पॅलेस हे भारतातील आणि देशातील महागड्या हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलचे एका रात्रीचे भाडे 14 लाख रुपये आहे.
3. हॉटेल प्रेसिडेंट विल्सन, जिनिव्हा
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरातील हॉटेल प्रेसिडेंट विल्सन हे देखील महागड्या हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलच्या एका रात्रीचे दर 38 लाख रुपये आहे.
4. द मार्क हॉटेल, न्यूयॉर्क
अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये द मार्क हॉटेल देखील महागड्या हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलच्या एका रात्रीचे दर 55 लाख रुपयांपर्यंत जाते.
5. रिट्ज-कार्लटन, शांघाय
रिट्ज-कार्लटन शांघायमधील हे एक महागडे हॉटेल आहे. या हॉटेलचा एका रात्रीचा दर 35 लाख रुपये आहे.
6. द रॉयल पेनिनसुला हॉटेल, हाँगकाँग
हाँगकाँगमधील द रॉयल पेनिनसुला हॉटेल देखील महागड्या हॉटेलच्या यादीत आहे. या हॉटेलचा एका रात्रीचा दर 34 लाख रुपयांपर्यंत आहे.
7. द ओबेरॉय अमरविलास, आग्रा
भारतातील दुसरे महागडे ‘द ओबेरॉय अमरविलास’ हे आग्रामधील हॉटेल आहे. या हॉटेलचा एका रात्रीचा दर 30 लाख रुपयांपर्यंत आहे.
8. द पॅलेस हॉटेल, सॅन फ्रान्सिस्को
सॅन फ्रान्सिस्कोमधील द पॅलेस हॉटेलचा एका रात्रीचा दर 30 लाख रुपयांपर्यंत आहे. हे एक जगातील महागड्या हॉटेलपैकी एक आहे.
9. अंबर्ले, मुंबई
भारतातील मुंबईमधील अंबर्ले हे आणखी एक महागड्या हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलचा एका रात्रीचा दर 28 लाख रुपये आहे. या हॉटेलचा जगातील महागड्या हॉटेलमध्ये समावेश आहे.
10. बुर्ज खलिफा, दुबई
दुबईमधील बुर्ज खलिफा हे देखील जगातील महागड्या हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलचा एका रात्रीचा दर 25 लाख रुपयांपर्यंत जातो. जगातील सर्वात उंच इमारतीमध्ये असलेले हॉटेल आहे.