Moto G52 Offer : अशी संधी पुन्हा नाही! ‘हा’ स्टायलिश फोन खरेदी करा 5 हजार रुपयांच्या सवलतीत, पहा किंमत

Ahmednagarlive24 office
Published:

Moto G52 Offer : जर तुम्ही स्वस्तात मस्त फीचर्स असणारा स्मार्टफोनच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्टवर तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कारण सध्या फ्लिपकार्टवर समर सेव्हिंग डेज सेल सुरू आहे.

या सेलमधून तुम्ही Moto G52 हा फोन कमी किमतीत खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 17,999 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही आता सवलतीत सहज खरेदी करू शकता. तुम्ही हा फोन चारकोल ग्रे आणि मेटॅलिक व्हाईट अशा दोन पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.

मोटोचा हा बजेट स्मार्टफोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटद्वारे समर्थित असून तो 6GB पर्यंत RAM सह जोडलेला आहे. कंपनीकडून या फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर Moto G52 मध्ये Dolby Atmos द्वारे ट्यून करण्यात आलेले स्टिरिओ स्पीकर आहेत. तसेच त्यात साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर दिले जात आहे.

किती आहे डिस्काउंट?

Moto G52 हा फोन 17,999 रुपयांऐवजी फक्त 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे. एक्सचेंज बोनससह 12,450 रुपयांच्या सवलतीत तो तुम्ही सहज खरेदी करू शकता. परंतु हे लक्षात घ्या की ही किंमत फोनच्या 4GB रॅम, 64GB स्टोरेजची असणार आहे. यात तुम्हाला स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर आणि 6.5-इंचाचा पोलइडी डिस्प्ले मिळत आहे. तर यामध्ये 1080×2400 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.6-इंचाचा FHD + डिस्प्ले देण्यात आला आहे.

Motorola च्या या स्मार्टफोनमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि f/2.4 अपर्चरसह 2MP मॅक्रो कॅमेरा दिला जात आहे. तर या फोनच्या समोर 16MP सेल्फी कॅमेरा दिला असून जो दोन स्टोरेज पर्यायांमध्ये येतो – एक म्हणजे 64GB आणि दुसरा म्हणजे 128GB. त्याशिवाय वापरकर्ते मायक्रोएसडी कार्डद्वारे या फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe