Motorola G54 5G : पैसे वसूल ऑफर! 6000mAh बॅटरी आणि 12GB RAM असणारा फोन ‘इतक्या’ स्वस्तात येतोय खरेदी करता

Published on -

Motorola G54 5G : तुमच्यासाठी Flipkart ने एक खास ऑफर आणली आहे. या सेलमध्ये तुम्ही आता खूप कमी किमतीत Motorola G54 5G हा फोन खरेदी करू शकता. ज्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत सहज करू शकता.

कंपनीचा हा फोन हे रॅम आणि स्टोरेजवर अवलंबून दोन प्रकारात येतो. किमतीचा विचार केला तर Motorola G54 5G चा 8GB रॅम व्हेरिएंट Rs 17,999 मूळ किमतीसह Flipkart वर Rs 14,499 मध्ये खरेदी करता येईल. तसेच बँक ऑफरनंतर, फोनवर 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यानंतर या फोनची प्रभावी किंमत 12,499 रुपयांपर्यंत खाली येते.

15 हजारांपेक्षा स्वस्तात करा खरेदी

तसेच, Motorola G54 5G चे 12GB RAM आणि 256GB स्टोरेज वेरिएंट तुम्ही 21,999 रुपये मूळ किमतीसह फक्त 16,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. बँक ऑफरनंतर, फोनवर 2000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते, त्यानंतर या फोनची प्रभावी किंमत 14,999 रुपयांपर्यंत खाली येते. तसेच हे फोन तीन रंगांच्या पर्यायांत येतात- मिडनाईट ब्लॅक, मिंट ग्रीन आणि पर्ल ब्लू रंग.

जाणून घ्या खासियत

स्टोरेजचा विचार केला तर कंपनीचे असे मत आहे की 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणारा हा पहिला 5G स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 18 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच या फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून हा फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000 mAh बॅटरी दिली आहे.

फोन MediaTek Dimension 7020 प्रोसेसरसह येत असून यामध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असून यात 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा दुय्यम कॅमेरा पाहायला मिळेल. त्याशिवाय सेल्फीसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन 14 5G बँडला सपोर्ट करत असून या फोनमध्ये Dolby Atmos सह स्टिरीओ स्पीकर्स आहेत आणि IP52 रेटिंगसह येतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!