लोहमार्ग सर्वेक्षणासाठी खासदार लोखंडे रेल्वेमंत्र्यांना भेटले

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News:बेलापूर-परळी लोहमार्गासाठी तातडीने सर्वे करण्यात येऊन या कामास गती देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांना भेटून व निवेदन देऊन केली.

यामुळे बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे -शेवगाव- गेवराई -बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामास गती मिळणार आहे. खासदार लोखंडे यांनी केंद्रीय रेल्वमंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी भेट घेत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, या लोहमार्गाची अनेक वर्षांपासूनची मागणी असून या मार्गासाठी ब्रिटिशकालीन सर्व्हेही झाला आहे.

यापूर्वीही तत्कालीन रेल्वेमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. नव्याने सर्व्हेत बेलापूर, शेवगाव, पाथर्डी-रायमोह-राजुरी-बीड-परळी या लोहमार्गासाठी ३ कोटी रुपयेही केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले आहेत.

बेलापूर-श्रीरामपूर-नेवासे-शेवगाव-गेवराई-बीड-परळी अशाच लोहमार्गासाठी तातडीने सर्व्हे करावा व या कामास वेग द्यावा, त्यामुळे या लोहमार्गामुळे ज्या ज्या तालुक्यातून हा मार्ग जाईल.

त्या त्या परिसराचा सुविधा निर्माण होऊन विकास होईल, असेही खासदार लोखंडे यांनी म्ह्टले आहे. खासदार लोखंडे यांनी पुन्हा रेल्वेमंत्र्यांचे बेलापूर-परळी रेल्वेमार्गाकडे लक्ष वेधल्याने या कामास गती मिळण्याची शक्यता आहे. शेतकरी, व्यापारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe