अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव ते नगर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषीत झालाय या रस्त्याचं काम येत्या पंधरा दिवसात सुरु न केल्यास
ठेकादाराला पकडुन त्याच्या तोंडाला काळ फासण्याचा ईशारा आता भाजपाचे खासदार सुजय विखेंनी दिलाय. नगर ते मनमाड ह्या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेत चांगला रस्ता शोधुनही सापडणार नाही
याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागतोय मात्र मागील कालावधीत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नगर मनमाड महामार्गावर चिखल बघायला मिळतोय.
रस्ता दुस्तीची मागणी नागरीक करत असून तर काही ठिकणी खड्यात बसुन आंदोलने केली जाताय.मात्र आता केंद्राकडुन साडेचार कोटी मंजुर करुन आणलेत तरीही पंधरा दिवसात काम सुरु न झाल्यास वैतागलेल्या नगरच्या खासदारांनी ठेकेदाराला काळे फासण्याचा ईशारा दिलाय.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम