एमपीएससी परीक्षा : तब्बल चार हजार जणांची दांडी

Published on -

MPSC Exam:काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची शहर परिसरातील ५० उपकेंद्रावर कडेकोट बंदोबस्तात परीक्षा घेण्यात आली. दरम्यान नगर केंद्रावर या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या १६ हजार ८१ उमेदवारांपैकी १२ हजार २०५ उमेदवार परीक्षेला हजर राहिले.

तर ३ हजार ८७६ जण गैरहजर राहिले. परीक्षे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. ही परीक्षा जिल्ह्यातील ५० उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी बारा या एका सत्रात संपन्न झाली. आहे.

परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना सकाळी साडेनऊ वाजता प्रवेश देण्यात आला. परीक्षेत उत्तरे लिहिण्यासाठी फक्त काळ्या शाईचे बॉल पॉईंटपेन वापरण्यास मुभा देण्यात आली होती.

कोणत्याही प्रकारची दूरसंचार साधने परीक्षा केंद्र परिसरात व परीक्षा दालनात आणण्यास, स्वतः जवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.

दरम्यान परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच परीक्षेसाठी नियुक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना परीक्षेसंबंधी साहित्याचे वितरण करण्यात आले होते. या परीक्षेसाठी १ हजार ४९० अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. परीक्षा केंद्र परिसरात सीआरपीसी १९७३ कलम १४४ (३) जारी होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe