MPSC News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे MPSC च्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एमपीएससी कडून नुकतीच एक मोठी पदभरती जाहीर करण्यात आली आहे.
महत्त्वाची बाब अशी की, इतिहासात पहिल्यांदाच एमपीएससीकडून एवढ्या मोठ्या पदांसाठी एकाच वेळी जाहिरात काढण्यात आली असून यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. खरे तर, या पदभरतीसाठी पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता.

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील कामकाज अधिक गतीमान होण्यासाठी पंकजा मुंडे यांनी विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आणि याच पाठपुराव्याला आता यश आले आहे असा आपण म्हणू शकतो. कारण की एमपीएससीच्या माध्यमातून या विभागातील रिक्त पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पशुधन विकास अधिकारी गट अ संवर्गातील 2795 पदांसाठी आयोगाकडून नुकतेच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याची भरती प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आयोगाकडे यासाठीचे मागणी पत्र सादर करण्यात आले होते,
त्यानंतर आता आयोगाने या मागणी पत्रावर सकारात्मक असा निर्णय घेतला असून भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून जे परीक्षार्थी या जाहिरातीची वाट पाहत होते त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या भरती प्रक्रियेमुळे आता ग्रामीण भागातील पशुपालक व शेतकरी बांधवांना अधिक चांगल्या दर्जाची सेवा मिळणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. जाणकार लोकांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, पशुधन विकास अधिकारी हे पद पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालय आणि क्षेत्रीय कार्यालयांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
यामुळे या एमपीएससी कडून करण्यात आलेल्या या जाहिरातीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळणार अशी आशा असून मोठ्या संख्येने विद्यार्थी या सुद्धा भरतीत सहभागी होणार आहेत. दरम्यान या पदभरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असल्याने या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून लवकरात लवकर अर्ज सादर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
खरेतर, सुधारित आकृतीबंधानुसार या विभागात एकूण 4 हजार 684 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 2 हजार 798 पदे रिक्त आहेत. महत्त्वाची बाब अशी की डिसेंबर 2025 अखेरपर्यंत आणखी आठ पदे रिक्त होणार आहेत.
म्हणजेच डिसेंबर अखेरपर्यंत या विभागात पशुधन विकास अधिकारी संवर्गात 2806 पदे रिक्त होणार आहेत. दरम्यान आता या रिक्त पदांपैकी 2795 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आता आपण या पदभरतीची माहिती थोडक्यात पाहूयात.
MPSC च्या नव्या पदभरतीची सविस्तर माहिती
कोणत्या पदासाठी होणार भरती?
एमपीएससी कडून जारी झालेल्या जाहिरातीनुसार या पदभरती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी या पदाची रिक्त जागा भरली जाणार आहे.
किती जागांसाठी होणार भरती
MPSC च्या गट अ संवर्गातील या पदांच्या 2795 जागांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता
पशुवैद्यक शास्त्र किंवा पशुसंवर्धन पदवी प्राप्त उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे.
अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार?
या भरतीसाठी 29 एप्रिल 2025 पासून अर्ज सादर करता येणार आहेत.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?
19 मे 2025 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तथापि अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य.