अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- महावितरण कंपनीच्या बाभळेश्वर उपविभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या पथकाने तीन ठिकाणी छापा टाकून 13 लाख 56 हजार 610 रुपयांची वीज चोरी पकडली. याप्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिली चोरीची घटना :- श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे सोहम मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट येथे चोरून वीज वापरल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बाभळेश्वर उपविभागातील सहाय्यक अभियंता सुरभि राजेश कनोजिया
यांच्या फिर्यादीवरून अजित महादेव कारंडे (रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कारंडे यांनी 12 लाख 24 हजार 770 रुपयांची वीज चोरून वापरल्याचे कनोजिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
दुसरी चोरीची घटना :- राहाता तालुक्यातील नांदूर येथील अभंग नावाच्या इसमाने त्याच्या घरी 130 युनिट वीज घरात चोरून वापरली. तिची किंमत 4 हजार 300 रुपये आहे.
बाभळेश्वर उपविभागातील ममदापूर ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता सचिन सीताराम बेंडकुळे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसांत भास्कर तुळशीराम अभंग, (रा. नांदूर, ता. राहाता) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी चोरीची घटना :- राहाता तालुक्यातील लोहगाव येथे औद्योगिक गिरणीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची 1,179 वीज युनिट किंमत 1 लाख 27 हजार 540 बीज गिरणीसाठी चोरून वापरली. याप्रकरणी मंगल उमेश काळे, (रा. लोहगाव, ता. राहाता) यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम