अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- बँका आणि खातेदार यांच्यामध्ये एक विश्वासाच नातं असतं. सर्वसामान्य नागरिक बँकेवर विश्वास ठेवूनच आयुष्यभराची पुंजी बँकेत ठेवतात. बँका देखील खातेदारांवर विश्वास ठेवूनच विविध योजनांचा कर्ज पुरवठा करतात.
या विश्वासाला तडा जाऊ न देता नागरिकांनी देखील वेळेत कर्ज फेडून स्वत:ची पत निर्माण करावी. बँकेचा विश्वास ही आपल्या विकासाची वाट आहे, तो सार्थ करा, असे प्रतिपादन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले. सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत एमएसएमई व होम लोन मेळावा संपन्न झाला.
यामध्ये कर्जदारांना 5 कोटी 11 लाख रुपयांचे धनादेश मंजुर करुन त्यामधील 1 कोटींचे वितरण नगरसेवक त्र्यंबके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घुटेवाडीचे सरपंच संतोष लोखंडे,
उद्योजक बबलू सुर्यवंशी, व्यवस्थापक संतोष देशमुख, चंद्रशेखर पिंपरकर, प्रकाश जोशी, सुहास देशपांडे, जयशंकर राठोड आदि मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक त्र्यंबके पुढे म्हणाले,सध्या विविध योजना बँकेमार्फत ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याची माहिती घेतली तरच त्याचा लाभ घेता येईल.
कर्ज घेतल्याशिवाय आपली प्रगती होत नाही. कर्ज घ्या, वेळेत ते फेडा म्हणजे बँक दुसर्यांदा तुम्हाला कर्ज देण्यासाठी तयार होईल, असे ते म्हणाले, यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बॅकेच्या विविध कर्ज योजनांची माहिती शाखा व्यवस्थापक संतोष देशमुख यांनी दिली. ते म्हणाले, सावेडीत ही शाखा गुलामोहोर रोडला सुरु करुन 10 वर्षे झाली.
आज एमएसएमई चे 3 कोटी 10 लाख रुपयांच्या प्रकरणाला तत्वता मंजुरी दिली तर गृह कर्ज योजनेची 1 कोटी 41 लाख रुपयांची प्रकरणे स्विकारली. एकूण 5 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करुन त्यापैकी 1 कोटी रुपयांचे धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे.
ग्राहक व बॅक एकमेकांबद्दल समजून घेतात. त्यामुळेच 10 वर्षात बँकेने अनेक कर्जदारांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण केले, त्यांची परत फेड करीत सभासदांनी तेवढेच सहकार्य बँकेला केले, असे ते म्हणाले.
सरपंच संतोष लोखंडे यांनी सभासदांना विविध कर्ज, लघु उद्योग, छोट-छोट व्यवसाय, बँकांच्या योजना कशा असता त्यांचा लाभ कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी बँकेचे प्रशांत काकड, गौरव धुमाळ, ऋतुजा जाधव, माधवी आष्टीकर, धनश्री आवारी, सभासद, कर्जदार उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम