मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

मुंबई : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा खासदार म्हणून त्यांचा कार्यकाळ हा ७ जुलै रोजी (गुरुवारी) संपणार आहे. मुख्तार नक्वी यांनी आपला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी हे मोदी सरकारमध्ये अल्पसंख्याक व्यवहार खाते सांभाळत होते. ते राज्यसभेचे सदस्य असून त्यांचा कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. यावेळी भाजपने नक्वी यांना राज्यसभेवर पाठवले नाही.

मुख्तार नक्वी यांच्या राजीनाम्यामागचे कारण समजू शकले नसले तरी त्यांना उपराष्ट्रपती केले जाऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री आरसीपी सिंग यांनीदेखील आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांच्याकडे दिला आहे.