लवकरच मुंबई ते पुणे प्रवास सुपरफास्ट ; मिसिंग लिंक प्रकल्पाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण, उद्घाटन ‘या’ तारखेला ? प्रवाशांचे 30 मिनिट वाचणार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर तयार होत असणाऱ्या मिसिंग लिंकचे काम हे जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. हा टप्पा पूर्ण झाला असल्याने आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता डिसेंबर 2024 पर्यंत हा प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा अंदाज समोर येऊ लागला आहे.

Published on -

Mumbai-Pune Expressway : मंडळी तुम्हीही मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करता का? अहो मग तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आत्ताच्या घडीचे सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबई ते पुणे प्रवास लवकरच सुपरफास्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला मिसिंग लिंक प्रकल्प लवकरच सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.

जेव्हा हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होईल तेव्हा या दोन्ही मेट्रो शहरा दरम्यानचा प्रवास 30 मिनिटांनी लवकर होणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर होणारी वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी होणार आणि प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार अशी आशा आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर तयार होत असणाऱ्या मिसिंग लिंकचे काम हे जवळपास पूर्णत्वाकडे पोहोचले आहे. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. हा टप्पा पूर्ण झाला असल्याने आता या प्रकल्पाचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे.

त्यामुळे आता डिसेंबर 2024 पर्यंत हा प्रकल्प वाहतुकीसाठी सुरू होऊ शकतो असा अंदाज समोर येऊ लागला आहे. जेव्हा हा मिसिंग लिंक मार्ग वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा मुंबई ते पुणे दरम्यान चे अंतर 6 km ने कमी होणार आहे.

यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे. हा प्रकल्प खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यास सक्षम ठरणार आहे. दरम्यान आता आपण या प्रकल्पाबाबत अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प ?

मिसिंग लिंक हा जवळपास 14 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पांतर्गत खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारले जाणार आहेत. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे.

तर छोटा बोगदा हा 1.67 किमी लांबीचा राहणार आहे. अजून या दोन्ही बोगद्यांची कामे सुरू आहेत. जोपर्यंत या बोगद्यांची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार नाहीये. मात्र या बोगद्यांची कामे आता जवळपास अंतिम टप्प्यात आहेत.

राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामं पूर्ण झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे.

या प्रकल्पांतर्गत खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे. खरे तर या पुलाचे काम हे पावसाळ्यामुळे अपेक्षित अशा गतीने पूर्ण होत नव्हते. मात्र अडथळ्यांची शर्यत पार करत राज्य रस्ते विकास महामंडळाने या टप्प्याचे काम पूर्ण केले आहे.

खरंतर या प्रकल्पाची मुदत मार्च 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र सध्याची कामाची गती पाहता आणि आतापर्यंत जेवढे प्रकल्पाचे काम झाले आहे त्या गोष्टी विचारात घेता हा प्रकल्प डिसेंबर अखेरीस सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची शक्यता नाकारून चालत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe