अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडीकडे जाणाऱ्या
रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेतीजवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले.
या घटनेची माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात समजताच पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत अधिक माहिती घेतली.
असे घडले हत्याकांड… :- बाबुराव निकम यांच्या लोखंडी शस्त्राने जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याचे निदर्शनास आले. मृत बाबुराव निकम यांच्या पत्नी लताबाई बाबुराव निकम यांच्याकडे चौकशी केली असता,
सवत झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा सोनू ऊर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व त्याचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे यांनी नेहमीच्या घरगुती वादाच्या रागातून पती बाबुराव निकम यांचा खून केल्याचे लताबाई निकम यांनी सांगितले.
पोलिसांनी लताबाई यांच्या तक्रारीवरून गुरुवारी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सोनू ऊर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व सोपान लक्ष्मण कोपरे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम